राजगड
राजगड...राजगड...राजगड...
सावधान!!!
मी पाहिल्याक्षणी प्रेमात पडलो असा गड. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा अप्रतिम क्कील्ला, स्थापत्य शास्त्राच्या द्रुष्टीने आणि सामरीक द्रुष्टीने जवळ जवळ अजिंक्य आहे. क्कील्याला ३ माच्या आहेत, सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अश्या ह्या ३ माच्या. सर्व माच्या तटबंदिने सुरक्षित केलेल्या आहेत, ही तटबंदि ३५० वर्षे झाली तरी भक्कम आहे. प्रत्येक माचीवरुन दिसणारे द्रुश्य तितकेच अप्रतीम आहे. मधे बालेक्कील्ला आणि ३ बाजुनां माच्या असा राजगडाच थाट आहे. राजगड पूर्ण पाहायचा म्हणजे २ दिवस तरी हवेतच, कारण नुसताच गडावर जाऊन पायपीट न करता, गडाचे सामरीक महत्व आणि त्याची सुंदरता डोळेभरून पहाणे जास्त महत्वाचे आहे. राजगडा बद्दल अजुनही खुप काही बोलता येइल, पन मी ते आत्ता टाळुन आमचे प्रवास वर्णन करतो :).बऱ्याच दिवसांपासून राजगडला जायच असे मनात घोळत होते पण मुहुर्त काही सापडत नव्हता, अखेर आम्हाला मुहुर्त मिळालाच, २८ - २९ तारखेला आम्ही म्हणजेच, मी, नचिकेत, मकरंद आणि संदीप आमच्या राजगडच्या मोहीमेचा दिवस फिक्स केला :P. आम्ही वाजेघर वरून पाली दरवाज्याने चढाई करायची असे ठरवले आणि २८ ला सकाळी ६.३० ला बाईक घेऊन निघालो, आम्ही ७.३० ला पायथा गाठला, मग तिथेच गाडी ठेवून, पूढे निघालो.
पूण्याहून निघतानाच पाऊस सुरु होता आणि इथेही तो चालूच होता. त्यामुळे आम्ही आनंदात होतो. थोडासा चढ झाल्यावर आम्ही,राजगडाच्या मुख्य डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. समोरचे द्रुश्य पाहून वेडेच झालो, गडाचा अर्धा भाग पूर्णपणे ढगांनी व्यापलेला होता. गड पूर्णपणे हिरवळीने नटला होता आणि माथ्यावर ढगांचे पूर्ण आवरण होते, मधूनच धबधब्यांचे पांढरे प्रवाह त्या गर्द हिरव्या रंगात उठून दिसत होते, सूर्याचा तर कूठेच पत्ता नव्हता, गडाचे असे पहीलेच रूप बघून आम्ही अतिशय आनंदित झालो, आणि जय शिवाजी - जय भवानी, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव असा जयघोष करत गड चढायला सूरुवात केली.
पाली दरवाज्याची वाट तशी चांगली आहे पण चढण बरीच आहे, त्यामुळे कमी वेळात जास्त अंतर पार करता येते, परंतु त्यामूळे दमायला पण होते, त्यात माझे वजन आणि पोट वाढल्याने अर्ध्या तासातच दमछाक सुरू झाली :ड, वाटेत पाउस मधे मधे सुरूच होता. सुरूवातीला जंगलातल्या माश्यांनी फ़ारच त्रास दिला, त्या चावत होत्याच पण रक्त पण पीत होत्या, अगदी पवसात पण त्या चावत होत्या, हळू हळू आम्ही वर पोहोचू लागलो, अर्ध्यात आल्यावर आम्ही पुर्णपणे ढगांनी वेढलो गेलो, एकदम ठंद वाटू लागले,
आम्हा सर्वांमधे नवीन जोश भरला गेला आम्ही नव्या दमाने चढाई सुरु ठेवली. बरच वर गेल्यावर आम्हाला पहिला बुरुज अस्पष्ट दीसू लागला आणि आम्ही पोहचालो एकदाचे असा निश्वास टाकणार इतक्यात उंच पायऱ्यांनी आमचे लक्श वेधून घेतले. त्या उंच पायऱ्या आणि खडा चढ बघून जरा फ़ाटलीच पण म्हटल आता मागे हटायचे नाही, मग काय घेतलं बजरंगबलीचे नाव आणि सुरूवात केली पायऱ्या चढायला, कीती होत्या हे काही मोजल्या नाहीत पण खुप होत्या :)
संदीप सगळ्यात आधी नथांबता वर पोहचला होता. हळू हळू सगळे भव्य पाली दरवाज्यत उभे होतो, जवळच १ छान छोटासा धबधबा होता, वारा आता अजुनच जोरात होता, ढग पुर्णपणे खाली उतरले होते आणि आम्हाला अगदि १-२ हात पलिकडच पण नीट दीसत नव्ह्ता. परत एकदा शिवरायांचे नाव घेतले आणि पद्मावती मंदिराकडे निघालो. अरे हो पाली दरवाजा पद्मावती माची जवळ आहे, येथुन मंदीर ५-१० मीनीटस वर आहे. पाउस सुरू होताच, आम्ही मंदिराजवळ पोहचलो आणि पटकन आत गेलो, दाराची उंची कमी असल्याने मस्त पैकी कपाळमोक्षा झाला :). डोके चोळत आत गेलो, आमच्या आधी तीथे काहि मुले होती पण ती परत जात होती, त्यांनी विचारले कि स्टोव आणला आहे का?? आम्ही नाही म्हणालो आणि ते म्हणाले कि लाकडे पेटनार नाहित कारण इथे २ दिवस पाउस सुरु आहे, आमची तीथेच फ़ाटली :), रॉकेल होते पण लाकडे नव्हती, बघु नंतर म्हणून आम्ही तो विषय संपवला आणि मस्तपैकी कपडे बदलून, मॅट्स पसरून जरा पडलो.मंदिराच्या दरवाज्यातून आणि खिडकीतून भसाभस ढग आत येत होते, आम्ही ढगांतच राहायला होतो असा म्हणता येइल :). मग नच्याने आणलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या पोटभर खाल्ल्या.
मग ५-१० मीनीटस मधेच मी आणि मकरंद किल्ला बघयला बाहेर पडलो, पहीले आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने निघालो, आता तर आम्हाला फ़क्त आमच्या पायखालचेच दीसू शकत होते इतके ढग आले होते, आम्ही मस्त पावसाची मजा लूटत जात होतो, सुवेळा माचीचा रस्ता बराच आहे, मग तिथे आम्ही काळेश्वर बुरुज, सुवेळा माची दरवाजा, चोर दरवाजा (ह्या दरवाज्याने येणा जवळ जवळ अशक्य आहे) आणि अत्यन्त प्रसिद्ध असे नेढे बघीतले. नेढे म्हणजे काळेश्वर बूरुजाच्या खालील कातळामधे असलेले मोठे खिंडार. मी आणि मक्या त्यात चढून बसलो :), तसा वारा खुप भन्नाट होता आणि पावसाने दगड फ़ारच निसरडे झाले होते, पण आम्ही चढलोच, मग तीथून निघालो आणि परत मंदिरात आलो.
रात्र झाली होती,आता देवळात ७० मानसे जमा झाली होती :), त्यामुळे खूप दंगा सूरु होता, इतक्यात नाश्या आणि नच्याला मुंग्या चावल्या, सहज म्हणून बघितलं तर नाश्याच्या मॅटखाली मोठ्या लाल मुंग्याचे वारुळ निघाले :) त्याची मॅट पोखरून त्या वर येत होत्या, मग आम्ही पटापट रॉकेल टाकले, ह्या प्रकारात मस्त अर्धा तास गेला. जेवायची वेळ झाली होती शिधा होता पण लाकडांचा पत्ता नसल्याने आम्ही ब्रेड, चीझ, जाम , सॉस असा ख्खाले मग फ़रसाण, पोहे, कांदा, मिर्ची टाकून मस्त भेळ केली. मग पांघरूणे काढली आणि झोपायची तयारी केली, जरा झोपतोय तर परत मुंग्यानचा ऍटॅक दूसरीकडून सूरु झाला मग परत रॉकेल प्रकरण झाले :फ, झोपायचा प्रयत्त्न करू लागलो, पोरे जोशात होती आणि उडंद गाणी सूरु होती. १२-१ च्या सूमारास माझ्या मॅट खाली मुंग्या निघाल्या :) मग परत रॉकेल प्रकरण झाले. मग मी आणि मक्या अर्धा तास बसून होतो, माझी पूर्ण खात्री झाल्यावर मग आम्ही दोघे परत झोपलो.
मग सकाळी ६.३० ला जाग आली. मग जरा आवरून संजीवनी माची बघायला बाहेर पडलो, अता तर वारं आणि पाउस अजूनच जोरात होते, छान दाट ढगांतून वाट काढत आम्ही माची वर पोहचलो, ही माची पण छान भक्कम आहे, मग परत फ़ीरून बालेकिल्ल्या पाशी आलो, वारा आणि पाउस खूप जोरात असल्याने आम्ही चढाइ केली नाही. मग तिथेच मस्त पावसात पोहे केले आणि पावसात भिजत खाल्ले. मग आम्ही जड मनाने खाली यायला सूरुवात केली, येताना वाट फ़ारच निसरडी झाली होती, मी दोन वेळा मस्त आपटलो, थोडसा खरचटले पण आता ठिक आहे अता तितकं चालायचचं नाही का?? तासाभरात खाली आलो, मागे वळुन पहीले आणि धुक्याने वेधलेल्या राजगडाचे मनोहारी रूप डोळ्यात साठ्वून मनोमन हिवळ्यात ययचा ठरवले, शिवरायांना परत वंदन करून आम्ही राजगडाचा निरोप घेतला.
त्या विशाल गडाला आणि त्याहून विशाल शिवरायांना ह्या माव्ळ्याचा त्रिवार मुजरा.
जय शिवाजी - जय भवानी।
उर्वरीत फोटोज इथे बघा:
6 Comments:
अप्रतिम रे. मायबोलित इतका मोठा लेख लिहायला भरपूर patience हवा.
zabardast re. barach adventurous hota mhanaycha tumchya trek. he mashya ani mungya avoid karayla lok usually kay kartat ?
masta.....amachach rajgad cha trek athavala. fakta aamhi toraNa karun mag rajagadavar alo hoto, sanjeevanivar pahile pochalo, darukhanyat rahilo ani tumhi jya rastyane var alat tithun utaralo khali..
sahi ahe bhidu.........pawsalyat gadacha saundarya ajunach uthun dista.......mazi jaljal hotiye re..
hiwalyat mi b yenar.........
fotosapratim......warnanhi apratim.....mastach....
khar saangu mitra......khup chaan anubhav aahe. aani aamhi mitr sudha pavsalyat gad firayala jato.......
तुमचा अनुभव मराठी मधून वाचून खुप छान वाटल...रामदासानी महाराजांना दिलेला उपदेश आपल्या पिढीने जोपासला पाहिजे.....मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
जय भवानी ! जय शिवराय !
Post a Comment
<< Home