Monday, November 26, 2007

कवडस्यां मधील जूनी आठवण

हो कवडस्यां मधील 1 जूनी आठवण,

काल सकाळी फारच ठंडी होती, आजीनी सकाल सकाल छान आल घालून चहा केला, त्या चहा चा आस्वाद घेता घेता सहज बाजूला लक्ष गेल तर खिडकीच्या फटीतुन १ सुरेख कवडसा घरात आला होता, आणि क्षणात माझे मन काही वर्ष मागे गेले .

ही गोष्ट काही जास्त जुनी नाही, ३-४ वर्षा पूर्वीची असेल. तेव्हा मी engg. ला होतो, आणि पुण्याला माझ्या आजी-आबां कड़े राहत होतो. आमचा घर पूर्व-पश्चिम आहे, सकाळची कोवली किरणे कडूनिम्बाच्या झाडामधून आणि खिड़कीतुन थेट घरात यायची. आणि मग सुन्दर कवडसे दिसयाचे. ठंदीच्या दिवसात तर ते कवडसे बघत बसावेसे वाटायचे . मी रोज सकाळी उठून अभ्यासाला बसत असे, मी ५ ला उठायाचो आणि ७ वाजता कवडसे येइपर्यन्त अभ्यास करायचो. मग माझी आजी मला छान गरमा गरम आल घातलेला चहा आणून द्यायची & त्या बरोबर पोलीचे तललेले टुकडे आणि त्यावर छान तिखट मीठ घालून द्यायची, तो गरम गरम नाश्ता & ते कवडसे अजूनही तसेच्या तसे प्रत्येक हिवाल्यत डोळ्यासमोर उभे राहतात, आणि मनाला त्या छान दिवसांची आठवण करत राहतात .

1 Comments:

At 11:52 PM, Blogger JustRead said...

Vinit ,aasha aathavani kadhun nusata basun rahila tari chan vatata!!!
tuzya barobar mala hi kavadasa anubhavayala milala.... mala ithe jasti chan vatala karan ikade ajunahi 15 may paryant thandi aahe,pan tasa kavadasa ithe nahi............
-Sonali

 

Post a Comment

<< Home