मित्रा आपण परत कधी भेटणार रे??
माझा १ मित्र १०-१५ दिवसांमधे कॅनडाला जातोय, बहुतेक तो तिथे १-२ वर्षे तरी राहीलच, तसे माझे पुष्कळ मित्र आता अमेरिकेमधे आहेत,आमचा कॉलेजमधील वर्ग साधारण ६०-७० विद्यार्थ्यांचा असेल आणि मी खात्रिपुर्वक सांगू शकतो की ह्याक्षणी त्यातील ५० तरी अमेरिकेमधेच असतील.एकाप्रकारे अभिमान वाटतो की सर्वांनी छान प्रगती केली आहे, आणि सर्वजण चांगले, सुखाचे आयुष्य जगत आहेत, आम्हा १० जणांचा १ फोटो मिळाला, त्यातले फ़क्त ३ (मला धरून) अता इथे आहेत, बाकी परत कधी भेटतील काय माहीत??
तिकडे मिलणारा पैसा, शांतता, भौतिक सुखासिनता सगळ्यांच आवडते त्यामूळे परत एकदा अमेरिकेमधे सेटल होण्याचे प्रमाण वाढत आहे. माझे अगदी जवळचे मित्र पण तिथेच सेटल होतील, आणि कदाचित कधीच परत येणार नाहीत. पण आता एकटं एकटं वाटू लागलय, कारण आई-वडील, भाऊ-बहिण, बायको ह्यापैकी कोणीच मित्रांची जागा घेउ शकत नाहीत. कधी कधी वाटत कि मस्त मित्रांबरोबर भरपूर फ़िरावं, कट्ट्यावर चकाट्या पिटाव्या, एखाद्याची भरपूर खेचावी, कॉलेजमधील "त्या" मूलींबद्दल गप्पा माराव्यात, खांद्यावर हात टाकून तासन्तास् फ़र्ग्युसन रोडवर फ़िरावं आणि अजूनही बरीच मोठ्ठी यादी तयार करता येइल. पण ते अता शक्यचं नाहीये, तुम्ही म्हणाल मला लॉंग टर्मचा चान्स मिळत नाही म्हणून मी जळतोय, पण तसं नाहीये हो, मीपण तिथे जाउन आलोय पण मला तिथे करमतच नव्हतं कारण मस्ती करयला तिथे माझ्याबरोबर कोणीच नव्हतं, आणि आता मी इथे आहे तर मस्ती करणारे तिकडे गेलेले आहेत :) कधी कधी त्यांना स्क्रॅप करतो, चॅटींगपण करतो, पण त्यातून काहीच जिव्हाळा वाटत नाही. आता असं वाटत की उरलेले मित्रपण तिकडे गेले तर कसं होणार?
मला परत इतके चांगले मित्र कसे काय मिळणार? आय.टीचे दुष्परिणाम मला असे होत आहेत :) अता फ़क्त उरलेला आयुष्य माझ्या जून्या मित्रांशिवाय काढावे लागू नये हीच देवाकडे प्रार्थना करतो. अरे मित्रांनो परत आलात की फोन करा रे..मधे मधे मेल्स् करत जारे..तेव्हडच जरा बरं वाटतं, तुम्ही मला विसरला असाल पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, कधीही हाक मारा, मी नक्की मदत करायचा प्रयत्न करीन.
के.के. च्या "अरे यारो" ह्या गाण्यामधील खालील काही ओळी किती योग्य आहेत नाही का?
"तेरी हरएक बुराईपे, दांटे वोह दोस्त,
गमकी हो धूप तो छाया बने, तेरा वोह दोस्त,
नाचे भी वोह तेरी खुशी मे;
अरे यारो दोस्ती बडीही हसीन है,
ये ना हो तो क्या फिर,बोलो जिंदगी है"

Labels: friends, friends get together., miss you all friends