Thursday, May 15, 2008

भारतात अस काय आहे की जे अमेरिकेत नाहीये???

मी डिसेंबर २००७ ते फेब २००८ ऑफिस च्या कामा निम्मित्ता अमेरिकेला गेलो होतो. तिथे असताना आम्ही मित्र मधेच घराची आठ्वन काढायचो. असाच एकदा बोलता बोलता विषय निघाला की अमेरिकेत तर सगळच आहे, अशी काहीच गोष्ट नाही जी अमेरिकेत नाही. माझ्या मित्राने असा प्रश्न चालता चालता मला विचाराला तेव्हा तिथे पाउस सुरु होता, त्यावर मी त्याला लगेच उत्तर दिला की अमेरिकेत पाउस पडल्यावर मातीचा सुंदर वास येत नाही :) आणि आम्ही दोघेही मोठयाने हसलो. नंतर आम्ही ऑफिस ला निघून गेलो, संध्याकाळी परत आल्यावर घरी बसलो, बाहेर पाउस पड़तच होता, काचेच्या मोठ्या खिडकीतुन मी बाहेर अमेरिकेतला पाउस बघत बसलो होतो. मनात परत सकाळच संभाषण आठवले.भारतात अस काय आहे की जे अमेरिकेत नाहीये, ह्या प्रश्नानी परत एकदा मनाचा ताबा घेतला.


मग मी विचार करू लागलो. पावसाच्या निम्मित्ताने खुप सार्या गोष्टी आठव्ल्या ज्या अमेरिकेत अजिबात नाहीयेत आणि कधी होणारही नाहीत. उदाहारनार्थ मातीचा सुंदर वास, पावसात मनसोक्त भिजणारी मुल-मुली, मित्र आणि घरन्च्या बरोबर केलेल्या वर्षा सहली, किल्ल्यान्वर जाणे आणि तिथे जाउन पावसात भरपूर भिजून मनसोक्त धड्पड़ने, सिंन्ह्गड़ वरची गरमा गरम कांदा भजी & झणझणीत झुणका भाकर, भिमाशंकर च्या डोंगरावरिल दाट धुकं आणि आले आणि गवती चहा टाकून केलेला वाफळता चहा, कॉलेज जवळचा झक्कास वडापाव, बालगन्धर्व पुलावर एकत्र खाल्लेल मक्याचं कणिस ;) साठलेला पाणी आणि त्यात उड्या मारणारी मूल, उधाणता समुद्र आणि ते उधाण बघायला जमलेली एका छत्रीतली जोडपी ;), बाइक वरून मनसोक्त भिजत मुळशी, पानशेत ला जायची खाज :P मग त्यानंतर सर्दी होउन ताप आल्य्वर कान धरणारी आई पण नंतर गरमा गरम चहा आणि भजी देणारी मग छान कपाळाला विक्क्स लावून देणारी आई. अशा बर्याच गोष्टी एक क्षणात डोल्यासमोरून निघून गेल्या, मला प्रकार्षानी घरची आठ्वण होऊ लागली आणि नकळतच डोळे भरून आले :)

डोळे पुसून माइक्रोवेव मधे चहा गरम करायला उठलो आणि हसू आले, कुठे तो सिंन्ह्गडा वरचा चुलिवर केलेला चहा आणि कुठे एसी किचनमधे केलेला माइक्रोवेव मधला चहा :P. परत खिडकीत येउन बसलो. परत विचार आला की ह्या सगल्या गोष्टी फ़क्त भारतात आहेत पण पावसाल्यात तसच बाकीच्या ऋतुंच्या पण गमती आहेतच की, पण ह्याहून पण खुप गोष्टी आहेत ज्या फ़क्त भारतात आहेत. आपल्याला देशाला समृद्ध संस्कृति आहे, आपल्या भुमित थोर स्वातंत्र्य सैनिक, थोर राजे आणि तितकेच थोर संत होउन गेले, आपल्याकडे अफाट साहित्य आहे, सुंदर कुटुंब व्यवस्था आहे, एकेमेकांची काळजी घेणारी जिव्हाल्याची मानसं आहेत, जिवाला जिव देणारे मित्र आहेत, नात्यांची घट्टा वीण आहे, उत्तम संस्कार आहेत आणि अशा अजूही खुप खुप गोष्टी आहेत त्याची लिस्ट किती मोठी होईल हे मलाही माहित नाही.


परन्तु गोष्ट पक्की कळाली की काहीही झाला तरी भारतात अश्या खुप गोष्टी आहेत ज्या अमेरिकेत नाहीत aani कधीही होणार नाहीत, पण भौतिक सुखांना आपले खरे सुख माननार्या लोकाना हे कुठे कळणार म्हणा, असो मी निर्णय घेतला होता की पैसे मिळवन्या पुरता ठीक आहे, पण अमेरिकेत कधीच सेटल व्हायचे नाही, कारण भारतात अमेरिकेपेक्षा नक्कीच जास्त गोष्टी आहेत..नाही का??? त्या बाहेरील पावसाचे मनोमन आभार मानले करण त्यामुळेच हा इतका विचार मी करू शकलो :D, चहा पण खुप गार होउन गेला होता, तो तसाच पिउन मी आधी घरी आईला कॉल लावायला उठलो आणि विचारांची तन्द्री तिथेच भंग झाली



Labels: ,